या टिप्स वापरून बनवा सुंदर आणि आकर्षक ओठ


गुलाबी ओठ आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात फार महत्वाची भूमिका पार पाडतात. महिलांचे सौदर्य सुंदर ओठ खुलवतात. कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरुनही ठरत असते. प्रत्येकालाच आपले ओठ हे सुंदर असावेत असे वाटत असते. त्यामुळे तुम्हाला काही टिप्स आम्ही आज सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ओठांना सुंदर बनवू शकाल.

चेह-यावरील सर्वात सुंदर भाग म्हणजे ओठ आहेत. आपल्या ओठांना सुंदर बनविण्यासाठी महिला लिप्स्टिक, मॉइश्चरायजर आणि इतरही काही वस्तूंचा वापर करतात. पण अनेकदा असे समोर आले आहे की, ओठांना लिप्स्टिक किंवा इतर काही वस्तूंचा वापर केल्याने ओठ काळे पडतात तसेच ओठ फाटतातही. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ओठ सुंदर आणि आकर्षक बनवता येतील.

१) लिंबामध्ये प्राकृतिक गुण असतात जे ओठांवरील काळे डाग दूर करतात. यासाठी १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यावा. त्यानंतर दोघांचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून ते ओठांवर लावावे.

२) गुलाबाच्या पाकळ्या ओठांवरील काळेपण दूर करण्यासाठी खुपच फायदेशीर ठरतात. याच्या नियमित वापराने ओठांचा रंग हल्का गुलाबी आणि चमकदार होतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दूधात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या ओठांवर लावाव्यात. मग, सुकल्यानंतर ओठांना धूवावे.

३) काळ्या मि-याची पूड पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जवळपास पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओठ पाण्याने धूवा.

४) गुलाबी आणि कोमल ओठांसाठी दही आणि एलोवेराची पेस्ट खुपच उपयोगी ठरते.