एचटीसी सिरीजमधला तिसरा स्मार्टफोन यू ११ भारतात लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनसाठी स्क्वीझ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. हे एकप्रकारचे एज सेन्स फिचर आहे. यात फोनच्या कडांवर प्रेशर देऊन अनेक कमांडर युजर देऊ शकतो. शिवाय या फोनच्या लिक्वीड सरफेस डिझाईनमुळे हा फोन अतिशय आकर्षक दिसतो आहे. एज सेन्स फिचरने युजर त्याचे आवडते गेम्स, अॅप्स लाँच करू शकणार आहे तसेच ईमेल व कॅमेरा ओपन करू शकणार आहे.
स्क्वीझ तंत्रज्ञानाने युक्त एसटीसी यू ११ भारतात आला
या फोनसाठी ५.५ इंची एचडी सुपर एलईडी डिस्प्ले कॉर्निंग गुरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. अँड्राईड नगेट ७.१, ६ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी व ती कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, रियर कॅमेरा १२ एमपीचा तर सेल्फी कॅमेरा १६ एमपीचा आहे. स्लो मोशन व फोर के व्हिडीओ त्यातून घेता येतात. क्विक चार्ज सपोर्ट व एक्स्ट्रीम पॉवर सेव्हींग मोड ची सुविधा असलेली ३ हजार एमएएच ची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोन फोर जी सपोर्ट करतो व त्याची भारतातील किमत आहे ५१९९० रूपये.