अमेरिकेच्या कस्टमायझेशन कंपनी हेझन मोटरवर्कसने पाहताच प्रेमात पडावे अशी बाईक सादर केली आहे. व्ही ट्वीन ले आऊट दिली गेलेली ही बाईक रॉयल एनफिल्डची आहे. मस्केट नावाने ती लाँच झाली असून ती पूर्णपणे हँडमशीनवर तयार केली गेली आहे. या बाईकमध्ये रॉयल एनफिल्डच्या ५०० सीसीच्या दोन बाईकचा दम एकत्र केला गेला आहे. म्हणजेच या बाईकला १ हजार सीसीचे इंजिन दिले गेले आहे.
रॉयल लूक्सची मस्केट बाईकप्रेमींना घालणार मोहिनी
या बाईकला गुडरिच सिल्वरटाऊन कारची रूंद टायर्स बसविली गेली आहेत. त्यामुळे ही बाईक मोठी वाटते. इंजिनही कस्टमाईज केले असल्याने तिला हेवी लूक आला आहे. क्रोम लेआऊट डिझाईनुळे ती अधिक देखणी बनली आहे. लाकडाच्या तुकडयावर प्रथम डिझाईन करून मग मशीनचे रूप तिला दिले गेले आहे. या बाईकची इंधन टाकी लांबुडकी आहेच पण हँडलबारही लांबुडके आहेत. बाईकची बॅटरी इंधन टाकीच्या आत बसविली गेली आहे व बाकी इलेक्ट्रीक वायर इंजिनाच्या खाली लपविल्या गेल्या आहेत. या बाईकची सीट वॉलनट लाकडापासून बनवून तिला वॉर्निशचे लेप देऊन चकचकीत केले गेले आहे.