अॅपलला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज


सॅन फ्रान्सिस्को – मुळ भारतीय वंशाचे असलेले चीप आर्किटेक्ट मनु गुलाटी यांच्यावर गुगलने मोठी जबाबदारी सोपवली असून ते यापूर्वी अॅपल कंपनीसाठी काम करत होते. त्यांनी मागील ८ वर्षे अॅपलसाठी काम केले आहे. ते आता गुगलच्या आगामी पिक्सल फोनसाठी काम करणार असल्यामुळे आता गुगल, अॅपलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

गुलाटी यांनी लिंक्डिन प्रोफाइलवर त्यांच्या या नव्या नोकरीची घोषणा केली आहे. ते आता गुगलसाठी एसओसी आर्किटेक्ट म्हणून काम पाहणार आहेत. अॅपलच्या आयपॅड, आयफोन आणि अॅपल टीवीसाठीही गुलाटी यांनी कस्टम चिप्स तयार करण्यातही मोठी जबाबदारी पार पाडली आहे. अॅपलने एकूण १५ चीपसाठी पेटेंट मिळवले आहेत. याचे श्रेय ज्यांना जाते त्यात गुलाटींचाही समावेश होतो.

Leave a Comment