ब्राझील – एक इंटरेस्टींग देश


ब्राझील नाव घेतले की आपल्या नजरेसमोर येतात ते कार्निव्हल, सांबा डान्स, त्यांचे सॉकर प्रेम व ब्राझीलची सुप्रसिद्ध कॉफी. अर्थात देशातील सर्वाधिक उंचीचा ख्रिस्ताचा पुतळा हे येथील आणखी एक आकर्षण असले तरी ब्राझीलची ओळख इतपतच मर्यादित नाही. हा देश एक इंटरेस्टींग देश असून पर्यटकांनी पर्यटनाशिवाय तेथील आणखीही कांही मनोरंजक माहिती गाठीशी ठेवायला हवी.


ब्राझीलने २००८ मध्ये जेंडर चेंज शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील जेष्ठ नागरिकांपैकी ४३ टक्के हायस्कूल पास केलेले आहेत. अमेरिकेनंतर सर्वाधिक संख्येने विमानतळ याच देशात आहेत आणि या देशातील कार्सपैकी ९३ टक्के कार्स नव्या कोर्‍या असून त्यांच्या साठी इथेनॉल हे इंधन म्हणून वापरले जाते. ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया आकाशातून पाहिली तर तिचा आकार विमानाप्रमाणे दिसतो. तसेच जपान नंतर जगात सर्वाधिक संख्येने जपानी कुठे असतील तर ते ब्राझीलमध्ये आहेत.


येथे ज्या मुलांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी बेस्ट मिल्क देशभर वितरित केले जाते. गेली १५० वर्षे हा देश कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे तसेच येथील स्नेक आयलंडवर कुणीच जात नाही कारण तेथे १ चौरस मीटर परिसरात किमान पाच साप दिसतात. ब्राझीलच्या तुरूंगात असलेल्या कैद्यांना पायडलची सायकल चालवावी लागते. त्यातून निर्माण होणारी वीज जवळच्या शहरांना पुरविली जाते व त्याबदली कैद्याची शिक्षा कमी केली जाते. या देशातील बोरोरो जमातीचे वैशिष्ठ अ्रसे की या सर्वांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. या देशात मतदान करणे बंधनकारक आहेच पण हा जगातला एकमेव देश आहे, जेथे टॅनिंग बेडवर बंदी आहे.

मकाऊ पोपट हा या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. ब्राझीलमधून ब्राझील नटसची सर्वाधिक निर्यात होते मात्र हे नटस ब्राझीलचे नाहीत तर बोलिव्हीयातून ते येथे निर्यातीसाठी येतात. ब्राझीलची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत असून ती आज जगातील सात नंबरची मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थात हा देश राहण्यासाठी अतिशय महाग आहे.

Leave a Comment