टेस्लासाठी अॅलन मस्कना हवी आयात करात सवलत


इलेक्ट्रीक कार मधले अग्रणी टेस्ला मोटर्सने भारतीय बाजारपेठेत उन्हाळ्यातच प्रवेशाची तयारी केली होती मात्र प्रत्यक्षात हे घडू शकलेले नाही. यामागे कंपनीचे मुख्य अधिकारी अॅलन मस्क याना भारत सरकारकडून आयात करात सवलत हवी असल्याचे व त्या संदर्भात भारत सरकारशी बोलणी सुरू असल्याचे कारण सांगितले जात आहे. भारताने २०३० पर्यंत देशात संपूर्ण पणे इलेक्ट्रीक कार्सची विक्री केली जाईल असे ध्येय ठेवले आहे व त्यासाठी टेस्ला भारतात प्रवेश करण्यास उत्सुकही आहे.

भारत सरकार सध्या ४० हजार डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या पूर्ण इलेक्ट्रीक कारच्या आयातीवर ६० टक्के सीमा शुल्क व आयात कर आकारते आहे. या पेक्षा अधिक किमतीच्या कार्ससाठी हाच कर १०० टक्के आहे. नवी दिल्लीत टेस्ला त्यांचा कारखाना सुरू करत आहे. तो पर्यंत भारत सरकारने आयात कार्सवर लादलेला कर कमी करून द्यावा असे मस्क यांचे म्हणणे आहे. एकदा या कार भारातातच असेंबल होऊ लागल्या की त्यावरील सीमा शुल्क संपुष्टात येणार आहे. टेस्ला भारतात त्यांचे मॉडेल तीन आणण्यास उत्सुक आहे कारण हे मॉडेल परवडणार्‍या किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहे. या कारची किंमत ३५००० अमेरिकन डॉलर्स असून ती एकदा चार्ज केली की २१५ मैलांचे म्हणजे साधारण साडेतीनशे किमी अंतर जाऊ शकते.

Leave a Comment