चीनने पहिली एक्सरे दुर्बीण अंतराळात पाठविली


चीनने गुरूवारी जगातली पहिली एक्सरे अंतराळ दुर्बीण यशस्वीरित्या अंतराळात पाठविली आहे. हार्ड एक्सरे मॉड्युलेशन टेलिस्कोप इनसाईट असे तिचे नामकरण केले गेले आहे. चीनमधील गोबी वाळंवटातील जुआंग सॅटेलाईट लाँच स्टेशनवरून तिचे प्रक्षेपण केले गेले. ही दुर्बीण २.५ टन वजनाची आहे. चीनी संशोधकांनी अनेक वर्षाच्या संशोधनातून तिची निर्मिती केल्याचे सांगितले जात आहे,.

या दुर्बीणीचा उपयोग प्रामुख्याने कृष्ण विवरांचा विकास, अतिप्रभावशाली चुंबकीय क्षेत्रे तसेच गॅमा किरणांचे स्फोट यांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. पृथ्वीच्या वर ५५० किमीवरच्या कक्षेत ती स्थिर केली गेली आहे. या दुर्बीणीच्या निरीक्षणातून पल्सारचा अंतराळ यानांना नेव्हीगेशनसाठी काय उपयोग करता येईल व गॅमा किरणांच्रा स्फोटातून बाहेर पडणार्‍या तरंगलहरींचा अभ्यास यासाठी उपयोग होऊ शकणार आहे. ही अंतराळातील छोटी वेधशाळाच असल्याचे चीनी संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment