देशभरातील पेट्रोलपंप चालक नरमले; संप घेतला मागे


नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार असून याच्या निषेधार्थ देशभरातील पेट्रोल पंप चालक 16 जूनपासून संपावर जाणार होते. पण आता देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.

१६ जूनपासून जगभरातील प्रगत देशांप्रमाणेच भारतामध्येही आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंसगतता राखून देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर दररोज निश्चित करण्यात येणार आहेत. १६ जूनपासून सरकारी तेल कंपन्या देशभरातील सर्व म्हणजे ५८ हजार पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलच्या दररोज आढावा घेणार आहेत. पण पेट्रोलपंप चालकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीतील चढउतार आणि विदेशी चलनाच्या विनिमय दरातील बदल यावर दररोज ठरणार आहेत. देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी या निर्णयाविरोधात संप करण्याचे जाहीर केले होते. पण आता हा संपाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे.

Leave a Comment