नांगरे पाटील यांचा युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सक्सेस मंत्रा


पुणे – ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम एबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमात यंदाचे युपीएससी २०१६च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी कोल्हापूर विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर यूपीएससी १०३ रँक भाग्यश्री विसपुते, यूपीएससी १६० रँक दिनेश गुरव, यूपीएससी ११ रँक विश्वांजली गायकवाड, यूपीएससी ७७३ रँक प्रांजल पाटील, यूपीएससी १५१ रँक सुरज जाधव उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ० तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी ० तास ठेवा, असे सांगितले. त्याचबरोबर फक्त १ तास दररोज व्यायामासाठी द्या. २ सेट सूर्यनमस्कार दररोज घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल. दररोज २ कप ग्रीन टी घ्या. यामुळे शरीरातील एक्सॉडिशन कमी होते. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घ्या. तीन वेळा छोटे छोटे ब्रेक घ्या. शॉर्ट मेंटल ब्रेक अतिशय महत्वाचे आहेत. तसेच या वेळेत भरपूर पाणी प्या. स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडे काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा. दररोज सकाळी ६ वाजता उठा. कारण लवकर उठे तो लवकर निजे त्यास आरोग्य लाभे असे त्यांनी सांगितले. दररोज ७ मिनिटे फक्त हसा. खूप हसा कारण हसल्यामुळे माईंड फ्रेश राहते. तुमच्या कामासाठी दररोज कमीत कमी ८ तास द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण ८ तास त्यासाठी वेगळे ठेवा. दररोज ९ मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल. शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.

Leave a Comment