जिओ आता दररोज देणार एक्सट्रा ४जी डाटा


पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन डाटा ऑफर घेऊन रिलायन्स जिओ आला असून कंपनीने यावेळी युझर्सला एक्स्ट्रा २०% ४जी डाटा ऑफर केला आहे. याचा फायदा जो LYF स्मार्टफोन वापरत असणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. या ऑफरचा बॅनर जिओने MyLyf या स्मार्टफोनच्या ऑफिशिअल वेबसाइटवर लावला असून ही ऑफऱ फक्त Lyf च्या water सीरीजमधील स्मार्टफोनवर खास देण्यात आलेली आहे.

अशी आहे रिलायन्स जिओची नवी ऑफर – Lyf च्या water स्मार्टफोनवर २०% एक्स्ट्रा डाटा मिळणार आहे. ज्यामध्ये ११ हँडसेटचा समावेश असून या स्मार्टफोनची रेंज ६५९९ रुपयांपासून ते ९६९९ रुपयांपर्यंत आहे. या स्मार्टफोनवर कंपनी १जीबी ४जी डाटा सोबतच एक्स्ट्रा २०० एमबी ४जी डाटा देत आहे. या युझर्सला कायम १.२ जीबी ४जी डाटा मिळेल. तसेच LYF च्या स्मार्टफोनची रेंज २९९९ रुपये ऐवढी आहे.

३१ मार्च २०१८पर्यंत ही ऑफर असणार आहे. तेच प्रत्येक महिन्याच्या रिचार्जवर ग्राहकाला ही एक्स्ट्रा ऑफर मिळणार आहे आणि तुमच्या रिचार्जवर मिळणारा फ्री डेटा हा अवलंबून असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ३०९ रूपयाचा डेटा वापरत असाल तर तुम्हाला ६जीबी महिन्याला डाटा मिळणार आहे.

Leave a Comment