इस्रोचा नवा जुगाड; बनवणार केरोसीनवर चालणारे रॉकेट इंजिन


नवी दिल्ली – आता आणखी एक नवीन प्रयोग करण्यासाठी एका हॉलिवुडपटाच्या बजेटमध्ये मंगळ मोहिम राबवून साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का देणारे इस्रो सज्ज झाले असून सर्व काही सुरळीत झाल्यास इस्रो २०२१पर्यंत आपल्या नवीन सेमी क्रायोजेनिक रॉकेट इंजिनची चाचणी घेणार आहे. कुठल्या महागड्या फ्यूलवर नव्हे, तर चक्क रिफाईन्ड केरोसीनवर हे रॉकेट इंजिन आकाझेप घेऊ शकणार आहे.

सध्या रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनसाठी लिक्वीड हायड्रोजन आणि लिक्वीड ऑक्सिजनचे मिश्रण असलेले घट्ट इंधन वापरले जाते. या इंधनास नेहमी -२५३ डिग्री सेल्सियस एवढ्या थंड वातावरणात गोठवून ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, इस्रोकडून विकसित केले जाणारे इंजिन रिफाईन्ड केरोसीनवर चालणार आहे. त्यास गोठवून ठेवण्याची काहीही गरज नसेल. सामान्य केरोसीनच्या तुलनेत रिफाईन्ड केरोसीन पर्यावरणपूरकही असेल असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे केरोसीन वापरल्यास ते रॉकेट इंधनापेक्षा स्वस्त राहणारच यासोबतच त्याला गोठवण्याचा खर्च सुद्धा येणार नाही.

Leave a Comment