प्रतिलीटरमागे १०० किलोमीटर एव्हरेज देणार टाटाची नवी कार


नवी दिल्ली: टाटा मोटर्स आता पुन्हा एकदा नव्या कारसह भारतीयांना नवा धक्का देण्याच्या तयारीत असून या कारमध्ये शानदार फिचर्ससोबतच केवळ १ लीटरमध्ये ही कार चक्क १०० किलोमीटर एवढे अंतर कापणार आहे. त्यामुळे तुम्ही या कारची टाकी एकदा का फुल केली की, तुम्ही ९०० किलोमीटरचे अंतर सहज कापू शकणार आहात.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ही नवी कोरी आणि बहुचर्चीत गाडी या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण याबाबत टाटा मोटर्सकडून अद्याप अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रीया अथवा माहिती देण्यात आली नाही. टाटा गेल्या काही काळापासून आपल्या कमी विक्री असलेल्या वाहनांबाबत गांभीर्याने विचार करत आहे. या शानदार कारचे डिझाइनही तयार झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चार सीटवाल्या या कारला टाटाने इकोफ्रेंण्डली बनवले आहे. या कारची संभाव्य किंमत ५ ते ६ लाख रूपये ऐवढी असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या कारला रतन टाटा यांनी ८२व्या जिनोव्हा मोटर शो कार्यक्रमादरम्यान सादर केले होते. अत्यंत कमी किमतीत असलेल्या नॅनो नंतर कमी इंधनात जास्त अंतर कापणारी कार भारतीयांना उपलब्ध व्हावी हे रतन टाटा यांचे स्वप्न होते. त्यामुळे देशातील मध्यमवर्गाला नजरेसमोर ठेऊन टाटा मोटर्सने या कारचे डिझाईन तयार केले आहे.

Leave a Comment