लेहची सुहानी सफर करविणारी बस सेवा सुरू


हिमालयाच्या बर्फाच्छादीत डोंगररांगा, हिमनद्या, खोल दर्‍या, खोरी यांचे समग्र दर्शन घडविणारी मनाली ते लडाखची राजधानी लेह बससेवा हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाने सुरू केली आहे. १ जुलैपासून ही सेवा सुरू होत असून त्यासाठी बुकींग करणे आवश्यक आहे. जगातील सर्वात उंच पहाडी रस्त्यावरील ही सर्वात स्वस्त बससेवा आहे. यात पर्यटक एकवेळचा प्रवास २९०० रूपयांत करू शकणार आहेत. जुलै ते सप्टेंबर या काळात ही बससेवा सुरू राहणार आहे. या


मनाली ते लेह या प्रवासासाठी २१ तास लागणार आहेत मात्र हा सर्वच मार्ग अतिशय निसर्गसंपन्न व डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. ५०० किमीचा हा प्रवास मनालीहून सकाळी १० याजता सुरू होईल तो दुसरे दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास संपेल. मध्ये हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाच्या केलाँग येथील चंद्रभागा हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम असेल. येथे प्रवाशांना चहा, नाश्ता, जेवण व राहण्याची सुविधा दिली जाणार आहे. विषम तारखेला मनालीहून तर सम तारखेला लेहहून या टू बाय टू डिलक्स, नॉन एसी बस प्रवास करतील. या प्रवासात बाराचाल, तंगलांग, खारदुंग्ला पाहता येणार आहे.

Leave a Comment