आगामी काळात हृदयरोग्यांचा जीव वाचविण्यात ड्रोन महत्त्वाची सेवा पुरवू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.स्वीडन मधील संशोधकांनी हृदयरोग्यांना आणीबाणीच्या परिस्थितीत योग्य उपचार उपकरणांनी सिद्ध असलेले ड्रोन तयार केले असून अॅम्ब्युलन्सच्या तुलनेत ते चार पट अधिक वेगाने रूग्णापर्यंत पोहोचू शकते असे दिसून आले आहे. स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी हे ड्रोन तयार केले आहे. ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रीलेटर असे त्याचे नामकरण केले गेले आहे.
हदयरूग्णांचा जीव वाचविण्यात ड्रोनचा वापर महत्त्वाचा ठरणार
हे ड्रोन आपत्कालीन चिकित्सा सेवेसाठी अतिशय योग्य ठरले आहे. यात बसविलेल्या उपकरणांमुळे रूग्णाच्या छातीचे ठोके जाणून घेतले जातात व गरज असेल तर त्वरीत विजेचा झटकाही दिला जातो. यामुळे हृदयाची धडकन पूर्वपदावर येण्यास मदत मिळते.या ड्रोनमध्ये जीपीएस व उच्च दर्जाचा कॅमेराही लावता येतो. संशोधकांनी केलेल्या प्रयोगात हे ड्रोन अॅम्ब्यलन्सच्या तुलनेत १६ मिनिटे अगोदर पोहोचले. हृदयाच्या झटक्यात हा काळ फार महत्त्वाचा ठरतो व त्यामुळे रूग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेकपटींने वाढते.