व्हिएन्नात जगातले पहिले सेक्सस्कूल सुरू


जगातले पहिले सेक्सस्कूल ऑस्ट्रीयाच्या व्हिएन्ना शहरात सुरू करण्यात आले आहे. या शाळेत दाखल होणार्‍यांना चांगले प्रेमिक बनण्याचे व प्रेमाच्या सर्व भाषा शिकविण्याचे काम केले जाणार आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक सत्राला १४०० पौंड म्हणजे १ लाख १५ हजार रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका यल्वा मारिया थॉम्पसन म्हणाल्या, आमच्या शाळेत १६ वर्षांवरील कुणीही प्रवेश घेऊ शकणार आहे.यात थेअरीपेक्षा प्रात्यक्षिकांवर भर असेल तसेच विद्यार्थी व विद्यार्थींनींसाठी एकच हॉस्टेल आहे त्यामुळे ते त्यांचा होमवर्क अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील. यात शरीरसंबंधांसाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या पोझ, प्रेम, स्पर्श, शारीरिक वैशिष्ठे यांचे व्यावहारिक ज्ञान दिले जाईल. कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणार्‍यांना सर्टिफिकेटही दिले जाणार आहे.

अर्थात या स्कूलला आत्ताच विरोध सुरू झाला असून या शाळेने केलेल्या भडक जाहिरातींवर यापूर्वीच बंदी घातली गेली आहे असेही समजते.