जुन्या नोटा बदलायच्यात? ५०० रु. द्या- ४५ रु.घ्या


नोटबंदी झाल्यानंतर ५०० व १ हजारच्या नोटा बदलून घेण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१६ रोजी संपल्यानंतर आजही अनेक जण या जुन्या नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा जुना नोटा बदलण्याचे प्रमाण आता खूपच वाढले असून हे काम करणार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटा बदलासाठी जबरदस्त कमिशन मागितले जात आहे व लोक ते देत आहेत. यात १०० रूपयांपैकी केवळ ९ रूपये नोटाधारकाला मिळत आहेत. याचाच अर्थ १ कोटी रूपयांच्या नोटांच्या बदली ९ लाख रूपये दिले जात आहेत. या संदर्भातले वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

या बातमीनुसार अनिवासी भारतीयांसाठी जुन्या नोटा बदलाची मुदत ३० जून २०१७ पर्यंत आहे. त्यामुळे या नोटा बदलाचा व्यवसाय तेजीत आला आहे. मधले दलाल १ टक्का कमिशन घेऊन या जुन्या नोटा अनिवासी भारतीयांपर्यंत पोहोचवितात व ते १ कोटीच्या बदली १० लाख रूपये देत आहेत. अशा नोटा बदलून घेणार्‍यात ज्यांनी आपले उत्पन्न जाहीर केलेले नाही तसेच ज्यांना भविष्यातही त्यांच्या उत्पन्न्नांचे मार्ग उघड करायचे नाहीत अशांचा भरणा आहे.

Leave a Comment