भारतात लाँच झाले नोकियाचे ३, ५, ६


ज्या मोबाईलची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ते नोकियाचे तीनही स्मार्टफोन्स भारतात अखेर लाँच करण्यात आले आहेत. नोकियाने भारतात नुकतेच नोकिया ३, नोकिया ५, आणि नोकिया ६ लाँच केले आहेत. पहिल्यांदा या फोन्सना नोकिया ३३१०सोबत बर्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने लाँचिंगवेळी सांगितले होते की, नोकियाचे भारतात विकले जाणारे सर्व फोन्स हे मेड इन इंडिया असणार आहेत.

नोकिया ५ हा स्मार्टफोन नोकियातील मध्यम असा फोन आहे. याचा डिस्प्ले हा ५.२ इंच असून ७२०p HD आहे. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनला देखील गोरिला ग्लास आहे. ४३०चे स्नॅपड्रॉगन प्रोसेसर आहे तर २ GB रॅम देण्यात आली आहे. ३००० mAH बॅटरी आहे. तर याला देखील फिंगर प्रिंट ऑप्शन आहे. तर १६ GB इंटरनल स्टोरेज असून मायक्रो एसडी कार्ड देण्यात आल्या असून १३ मेगापिक्सल कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल असणार आहे.

नोकिया ३ या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.० इंचाचा असणार आहे. तर मीडिया टेक MT६७३७ प्रोसेसर, २ GB रॅम असणार आहे. ३६५० mAH बॅटरी आहे. तर १६GB इंटरनल स्टोरेज असणार आहे. तसेच प्रायमरी आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही ८ मेगापिक्सल आहे.

नोकिया ६ हा फोन तिन्ही स्मार्टफोनमध्ये हा टॉप मॉडेल असून त्याचा डिस्प्ले ५.५ इंच असून फूल एचडी असणार आहे. या स्मार्टफोनला गोरिला ग्लास ३ आहेत. तर ४३०चे स्नॅपड्रॉगन प्रोसेसर, ३GB रॅम आहे. तसेच ३००AH बॅटरी असणार आहे. तसेच आकर्षित करणारे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ३२ GB इंटरनल स्टोरेज दिले असून यामध्ये १६ मेगापिक्सल कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा आहे.

Leave a Comment