नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील शेट्टीचे मराठी चित्रपटात पदार्पण


बॉलिवूडचे अनेक अभिनेते मराठी चित्रपटांची चलती पाहता आता मराठी चित्रपटात काम करताना दिसतहेत तसेच काही चित्रपटांची निर्मिती करतानाही दिसत आहेत. अनेक हिंदी अभिनेत्यांनी मराठीत काम केल्यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच मराठी चित्रपटात बघायला मिळणार असून त्याच्यासोबतच अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेत्री तमन्ना भाटीया सुद्धा याच चित्रपटात एकत्र येणार आहेत.

हे तिघे लोकप्रिय कलाकार सामाजिक विषयावरच्या ‘अ ब क’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेत. त्यात हा चित्रपट पाच भाषांमध्ये तयार होत असल्यामुळे नवाजुद्दीनला मराठी चित्रपटात काम करताना बघण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. मिहीर कुलकर्णी हे ‘अ ब क’ या चित्रपटाची निर्मिती करत असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पड्ला. या यावेळी अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तसेच ‘लायन’ फेम सनी पवार, सनीचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी या प्रसंगी उपस्थित होते.