ह्युंदाईची एसयूव्ही कोना लाँच


ह्युंदाईने या वाहन निर्मात कंपनी आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही वरून पडदा बाजूला सारला असून, ही नवीन एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात देखील उतरवली जाईल. कोना असे नाव या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला देण्यात आले असून कंपनीतर्फे दिसायला अतिशय सुंदर आणि आलिशान असलेली ही गाडी अनेक वैशिष्ट्यांनी सजलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

२ लिटरचे ४ सिलिंडरवाले इंजिन जगभरात लॉन्च करण्यात येणाऱ्या कोना च्या व्हेरिएण्टमध्ये असेल. १४७ हॉर्सपॉवरच्या या इंजिनचा टॉर्क १७९ Nm असेल. या गाडीत ६ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. गाडीचा टॉप स्पीड १९४ किमी प्रतितास एवढा असेल, असा दावा कंपनीने केला आहे. तर डिझेल प्रकारातील गाडीत १.६ T-GDI इंजिन असेल. यात ७ स्पीड ट्रान्समिशन देण्यात येईल. पेट्रोल प्रकारातील गाडी ०-१०० किमी प्रतितासाचा वेग केवळ दहा सेकंदात तर डिझेल प्रकारातील गाडी ७.७ सेकंदात गाठेल, असा दावा कंपनीने केला आहे. या दोन प्रकारांव्यतिरिक्त इंजिनचे अन्य पर्यायदेखील उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडीत इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग पर्याय उपलब्ध असतील.

Leave a Comment