लो बजेट एअरलाईन म्हणून प्रसिद्ध असलेली स्पाईस जेटने आता कमी किंमतीतील तिकीटांबरोबरच कपडे व अन्य वस्तू विकण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ई कॉमर्स रिटेल व्हेंचर स्पाईस स्टाईल लाँच केले आहे. या पोर्टलवर कपड्यांबरोबरच अन्य फॅशन साहित्याची विक्री केली जाणार आहे. आत्तापर्यंत इन फ्लाईट सेवा देणारी ही कंपनी आता ई कॉमर्स पोर्टलच्या सहाय्याने त्यांच्या ग्राहकांना सेवा देणार असून त्यासाठी त्यांनी ब्रँड स्टोअर्स अमेझॉन बरोबर सहकार्य करार केला आहे.
स्पाईसजेट प्रवासात करता येणार कपडेखरेदी
या सेवेअंतर्गत कंपनी त्यांच्या कांही नियमित ग्राहकांना २५ टक्के डिस्काऊंटची ऑफर देत आहे. येथे स्पाईसजेट पोर्टफोलियोमधील सर्व ब्रँड उपलब्ध आहेत. कंपनीचे प्रमुख अजयसिह यांनी मार्चमध्येच कंपनी मेट्रो सिटीमध्ये स्टोअर्स व मॉल्स उघडून रिटेल सेगमेंटमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले आमच्या खास उत्पादनांच्या विक्रीसाठी दिग्गज ई कॉमर्स कंपन्या काम करणार आहेत. ग्राहक त्यांना हव्या असलेल्या उत्पादनांची मागणी ऑन बोर्ड करू शकतील तसेच पोर्टलवरूनही करू शकणार आहेत.