डीएस ग्रुपची पल्स सर्वाधिक खपाची टॉफी


देशात टॉफी मार्केटची वाढ वेगाने होत असून त्यातही हार्ड टॉफी मार्केट २०१६-१७ मध्ये अतिवेगाने वाढल्याचे नेल्सनने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या क्षेत्रात पार्ले, डीएस ग्रुप व नेस्ले अशा कंपन्यांचे वर्चस्व आहे. मात्र यात सर्वाधिक विक्री होणारी टॉफी डीएस ग्रूपची पल्स ही असल्याचेही दिसून आले आहे. टॉप पाच हार्ड टॉफीमध्ये पल्स आघाडीवर आहे.

पूर्ण टॉफी सेगमेंटमध्ये हार्ड टॉफीचा शेअर टोटल मार्केमध्ये ४८ टक्के आहे. त्यापाठोपाठ च्युईंगमचा २०, जेलीचा १, लॉलीपॉपचा ४ टक्के शेअर आहे. पैकी पल्सची विक्री २०१६-१७ मध्ये ३४० कोटींवर आहे. त्यापाठोपाठ कोपिको ३०६ कोटी, कच्चा मॅगोबाईट २२९ कोटी, कँडीमॅन १६१ कोटी, अल्पेनलिबे १३४ कोटी यांचा नंबर आहे.

Leave a Comment