कामसूत्र थीमवर फियाट कार कस्टमाईज


आपली आवडती कार अथवा बाईक कस्टमाईज करून घेण्याचा ट्रेंड सध्या वाढत चालला आहे. मात्र यातही कस्टमाईज करताना कार अथवा बाईक शक्यतोवर एकाच कलरमध्ये कस्टमाईज केली जाते. इटालीच्या गॅराज इटालिका कस्टमने मात्र यातही आघाडी घेतली असून त्यांनी फियाट कार कामसूत्र थीमवर अनेक रंगात कस्टमाईज केली आहे. अशा ५०० कार तयार केल्या गेल्या आहेत. त्यात कारच्या चारी बाजूंनी भारतीय व जपानी कामसूत्रांमधील चित्रे रेखाटली गेली आहेत.

गॅराज इटालिका सर्वसाधारणपणे बीएमडब्ल्यू आय ८, आय ३ कार डिझाईनसाठी विशेष प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांनी फियाट कार कस्टमाईज केल्या आहेत व त्यासाठी स्पेशल हीट सेंसिटिव्ह थर्मोक्रोमिक वॉर्नीशचा लेप रंगविलेल्या चित्रांवर दिला गेला आहे. अॅडल्ट थीमवरच्या या कार दोन व्हर्जनमध्ये आहेत. भारतीय थीममध्ये कारच्या बाहेरच्या बाजूला विविध पोझिशनमधील कपल्स दाखविली गेली आहेत तर दुसरी थीम जपानी कामसूत्रावर आधारित असून त्यात १९ व्या शतकातल्या शुंगा वूडब्लॉकचे चित्रण आहे. यात गुप्तांगेही रेखाटली गेली आहेत.

या कार्सचे इंटिरियर अतिशय एक्सायटींग बनविले गेले आहे. आतल्या बाजूला लाल रंग दिला गेला असून खासगीपणा जपायचा असेल तर काचांवर लाल पडदे सोडण्याची सोय आहे. तसेच अॅडल्ट ओन्ली ही साईन ऑन करता येणार आहे. मागच्या विंडस्क्रीनजवळ ही साईन आहे. कार कस्टमाईज करताना ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पारंपारिक इटालियन आर्ट रूपातच ती डिझाईन केली जाते असे कंपनीतील अधिकारी सांगतात.

Leave a Comment