जगातील सर्वात स्वस्त व छोटा सौर दिवा


ब्रिटनमधील मँचेस्टर एसएम इन्हेंटीड कंपनीने चीनी कंपनी यिंगली अॅन्ड चॅरिटी सोलर एडच्या सहकार्याने जगातील सर्वात स्वस्त सौर दिवा तयार केला असून या दिव्याची किंमत ५ डॉलर्स म्हणजे ३२५ रूपये आहे. हे दिवे प्रामुख्याने आफ्रिकेत वीजेविना जगत असलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी तयार केले गेले आहेत. हे दिवे मलावी, युगांडा, झांबिया मधील नऊ हजार कुटुंबाना प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यासाठी दिले गेले असल्याचे समजते.

हा सोलर दिवा एका हातात मावतो व पूर्ण चार्ज केल्यानंतर आठ तास चालतो.तो स्टँडवर ठेवता येतो तसेच स्ट्रॅपच्या सहाय्याने डोक्यावर बांधता येतो. तसेच बाईकवरही बांधता येतो. कंपनीचे सहसंस्थापक हेन्री जेम्स या संदर्भात बोलताना म्हणाले, आफ्रीकेतील अनेक गरीब देशात आज वीज नाही व तेथील लोकांना रॉकेलचे दिवे पेटवूनच उजेड मिळवावा लागतो. त्यांच्या महिन्याच्या कमाईतील एक तृतीयांश भाग रॉकेल खरेदी करण्यात जातो. या लोकांसाठी आम्ही हे दिवे प्रामुख्याने तयार केले आहेत. स्वस्त दराचे सौर दिवे हे लोक सहज खरेदी करू शकतील व आवश्यक प्रकाश मिळवू शकतील ही भावना यामागे आहे.

Leave a Comment