पाण्यातही चालणार मोटो एक्स फोर स्मार्टफोन


मोटोरोला नऊ नवे स्मार्टफोन बाजारात सादर करण्याच्या तयारीत असून त्यांचा वैशिष्ठपूर्ण मोटो एक्स फोर हा स्मार्टफोनही त्यांत समाविष्ट आहे. हा फोन वॉटर ऑपरेटिंग सिस्टीम आयपी ६८ सर्टिफाईडसह येणार आहे. म्हणजे अर्धा तासपर्यंत हा फोन पाण्यात असतानाही चालू शकणार आहे. तसेच मोटोरोलाचा हा पहिला ड्यूअल कॅमेरा फोन असेल. या फोनची भारतीय बाजारातील किंमत २१ हजार रूपयांपर्यंत असेल असे समजते.

या फोनला ३८०० एमएएच बॅटरी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीसह दिली गेली आहे. याचे मेटल बॉडीऐवजी ग्लास डिझाईन असून ५.५ इंची एचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, तसेच दोन रियर कॅमेरे दिले गेले आहेत. या फोनचे हेच फिचर इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. ब्राझील इव्हेंटमध्ये ३० जूनला हा फोन मोटो जी५, जी ५एस, झेड टू, झेडटू फोर्स अशा अन्य फोनसह लाँच केला जाणार आहे.

Leave a Comment