दक्षिण कोरिया- एक अजबगजब देश


इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रात उत्तमोत्तम उत्पादने करणारा, प्रगत मानला जाणारा व कार निर्मितीतही अग्रेसर असलेला दक्षिण कोरिया हा देश हा एक अजबगजब देश आहे. या देशातील नागरिक अंधश्रद्धाळू आहेत व दीर्घकाळ पूजा अर्चा करण्यात वेळ घालवितात. येथे अनेक समजूती आजही प्रचलित आहेत व त्या फारच मजेशीर अ्राहेत.

या देशात चार नंबर हा मृत्यूचा आकडा मानला जातो. त्यामुळे उंच इमारती बांधल्या गेल्या तरी ४ नंबरचा मजला नसतो. हॉस्पिटल, लिफ्टलाही चार नंबरचा उल्लेख नसतो. येथील नागरिक जन्माला येतानाच एक वर्षाने मोठे असतात. म्हणजे जन्माला आलेले मूल १ वर्षाचेच मानले जाते. लाल हाही येथे मृत्यूचा रंग मानला जातो व त्यामुळे येथे लाल रंगाच्या शाईचा वापर केला जात नाही. नागरिकांना कुठेही, कधीही दारूसेवनाची परवानगी आहे. मग तो बार असो, शॉप असो वा रेल्वे असो. येथे व्हेंडींग मशीनमधूनही दारू मिळते. त्यामुळे बरेचदा टल्ली झालेले लोक येथे आढळतात.


या देशात महिन्यातला चौदावा दिवस हा रोमँटिक दिवस मानला जातो. या दिवशी मुली मित्रांना अथवा बायका नवर्‍यांना कांही भेटवस्तू देतात मात्र मित्र व नवरे लोकांना त्याबदली १४ मार्च रोजी तिप्पट रकमेच्या भेटवस्तू द्याव्या लागतात. येथे रक्तगटाला अतिशय महत्त्व दिले जाते. तुम्ही चांगले आहात का वाईट, तसेच धोकेबाज आहात का प्रामाणिक याची परिक्षा रक्तगटावरून केली जाते. प्लॅस्टीक सर्जरी करून घेण्याचे या लोकांना जणू वेडच आहे व प्लॅस्टीक सर्जरी करून घेणार्‍याची तारीफ केली जाते. येथील लेाक प्रामुख्याने डोळे मोठे करून घेण्यासाठी, नाक मोठे करून घेण्यासाठी व सुंदर हनुवटीसाठी प्लॅस्टीक सर्जरी करतात.कोरियन पुरूष मेकअपवर हजारो रूपये खर्च करतात व येथे पुरूषांना ब्यूटी टिप्स देणारे अनेक चॅनल्स आहेत. एकच आडनाव असलेल्या व्यक्ती आपसात विवाह करत नाहीत.


विरोधाभास असा की या देशाचा इंटरनेट स्पीडमध्ये जगात पहिला नंबर आहे व इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाण ९३ टक्के आहे. तसेच आत्महत्त्या करण्याच्या प्रमाणात या देशाचा जगात दुसरा नंबर आहे. येथील नागरिक इलेक्ट्रीक फॅन रात्रभर सुरू ठेवत नाहीत कारण रात्रभर फॅनखाली झोपणार्‍याचा मृत्यू होतो असा येथे समज आहे. भारत व द. कोरिया या दोन देशात एक महत्त्वाचे साम्य आहे व ते म्हणजे या दोन्ही देशांचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट हाच आहे.