लक्झरियस महाराजा एकस्प्रेसमधून करा द.भारताची सैर


इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कार्पोरेशनतर्फे १ जुलै ते ८ जुलै दरम्यान लक्झरियस महाराजा एक्स्प्रेसने द. भारतातील प्रेक्षणीय स्थळांची सैर करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या राजाच्या थाटात ही सैर करता येणार आहे फक्त त्यासाठी भलीमोठी रक्कमही मोजावी लागेल. त्रिवेंद्रम, चेट्टीनाड, तंजावूर, महाबलीपूरम, मैसूर, हंपी, गोवा व मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असेल.


या आलिशान रेल्वेमध्ये डिलक्स केबिनसाठी जेष्ठ नागरिकांना ५ लाख व जादा सीटसाठी साडेतीन लाख रूपये भरावे लागतील छोट्या स्यूटसाठी हेच दर ७ लाख व जादा सीटसाठी साडेसहा लाख रूपये असतील. स्यूटसाठी १० लाख तर प्रेसिडेन्शियल स्यूटसाठी १७ लाख रूपये भरावे लागणार आहेत. या रेल्वेतून डेली बेसिसवर प्रवास करण्याची संधीही उपलब्ध आहे. त्यासाठी डबल शेअरिंग मध्ये दररोज ३३२५० तर सिंगलसीटसाठी ५३२०० रूपये भरावे लागतील. कर वेगळे भरावे लागतील.

या रेल्वेला २३ डबे असून त्यातून ८८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. केबिन साईज प्रशस्त आहे व त्यात दोन बार लाऊंज, दोन रेस्टॉरंट यांचाही समावेश आहे. ही गाडी १ जुलैला त्रिवेंद्रमहून निघून ८ जुलैला मुंबईला पोहोचणार आहे.

Leave a Comment