चीनने एकचवेळी उडविली ११९ ड्रोन


गतवेळी एकाच वेळेला ६७ ड्रोन लाँच करण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर चीनने आता एकाचवेळी ११९ ड्रोन लाँच करण्याचा विक्रम नोंदविला आहे. चायना इलेक्ट्राॅनिक्स टेक्नॉलॉजी ग्रूप कार्पोरेशन ने कॅटपुल्ट म्हणजे एकाच वेळी अनेक वस्तू दूर फेकणारे उपकरण याच्या सहाय्याने ही ड्रोन लाँच केली. अर्थात चीनच्या या प्रयोगावर या क्षेत्रातील अनेक तज्ञांनी नाराजीचा सूर लावला असून यामुळे सामान्यांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

सीईटीसीचे इंजिनिअर झाओयांजी या प्रयोगासंदर्भात बोलताना म्हणाले,१९१७ साली ड्रोन चा शोध लागल्यानंतर या इंटेलिजन स्वार्म ड्रोन चा युद्ध नियम बदलण्यात महत्त्वाचा हिस्सा असणार आहे.जाणकारांच्या मते मात्र ही चीनी ड्रोन अवघ्या हजार रूपयांपासून मिळत आहेत व त्यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होण्याचा धोका मोठा आहे. या ड्रोनचा गैरवापर केला जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे,

भारताचाच विचार केला तर येथे ड्रोन वापरावर कडक निर्बंध नाहीत. या ड्रोन ची कुणीही खरेदी विक्री करू शकते. विना कॅमेरेवाली ड्रोन ९०० ते १२०० रूपयांत, कॅमेरेवाली १८०० ते ३५०० रूपयांत तर वायफाय सुविधेसह असलेली ड्रोन ३५०० ते ५ हजार रूपयांत उपलब्ध आहेत. वायफाय व कॅमेरेवाल्या ड्रोन ने कॅप्चर केलेले फोटो व व्हिडीओ मेाबाईलवर लाईव्ह पाहता येतात. यांची विक्री ऑनलाईन साईटवर होते. यामुळे हा देशाच्या तसेच नागरिकांच्या वैयक्तीक सुरक्षेला मोठाच धोका असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment