अॅपलचे वापरलेले जोडे लिलावात, किंमत ९ लाख रूपये


आयफोन, आयपॅड, मॅकबुक अशी जगप्रसिद्ध उत्पादने जागतिक बाजारात विकणार्‍या अॅपलने आता जुने जोडे विक्रीला काढले असून असे जुने जोडे विकण्याची कंपनीची ही दुसरी वेळ आहे. त्यांच्या कर्मचार्‍यांनी वापरलेले हे सेकंडहॅड बूट अमेरिकेच्या ऑक्शन हाऊस हेरिटेज ऑक्शन्सतर्फे लिलावात विकले जात असून ग्राहकांना ते ई कॉमर्स ईबे वर विकत घेता येणार आहे. या बूटांसाठी सुरवातीची किंमत १५ हजार डॉलर्स म्हणजे ९ लाख ६५ हजार रूपये आहे.या लिलावाची सुरवात ११ जूनपासून होणार आहे.

२००७ सालीही अॅपलने जुन्या बुटांचा असा लिलाव केला होता तेव्हा त्यांची किंमत १०५ डॉलर्स म्हणजे ६७६० रूपये होती. आता लिलावात विकले जाणारे बूट हे अॅपलने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी १९९० साली घेतलेले होते. आदिदास कंपनीने ते तयार केले असून त्याच्यावर अॅपल ब्रँडचा क्लासिक अॅपल रेनबो लोगो आहे. या बूटांचा अमेरिकन साईज ९.५ इंच आहे. तज्ञांच्या मते या बुटांसाठी ३० हजार डॉलर्सची बोली लागू शकेल.

Leave a Comment