जाणून घ्या 1G, 2G, 3G, 4G, 5G चा अर्थ


मुंबई – आजच्या घडीला भारतीय बाजारपेठेत अनेकप्रकारचे स्मार्टफोन्स उपलब्ध असून ज्यामध्ये 1G, 2G, 3G किंवा 4G सपोर्ट करणा-या फोन्सचा समावेश आहे. सध्याचा ट्रेंड पाहता आपल्याकडे देखील 4G फोन असावा असे प्रत्येकालाच वाटते पण आपल्यापैकी किती जणांना 4G म्हणजे काय हेच नक्की माहित नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला 1G, 2G, 3G, 4G आणि 5G यांचा अर्थ कळेल.

सर्वात आधी आपण G चा अर्थ जाणून घेऊ या. G चा अर्थ आहे जनरेशन (Generation). जेव्हा-जेव्हा एखाद्या फोनमध्ये नवी टेक्नोलॉजी येते त्यावेळी त्याला नेक्स्ट जनरेशनचा स्मार्टफोन असे म्हटले जाते. यापूर्वी वायरचे फोन होते त्यानंतर कॉर्डलेस फोन आले आणि आता वायरलेस फोन्स उपलब्ध आहेत.

वायरलेस फोनसाठी 1G सर्वात पहिली जनरेशन होती. ही अँनलॉग सिग्नलचा वापर करते. याचे सादरीकरण १९८० मध्ये करण्यात आले होते. याची स्पीड लिमिट २.४ kbps वर काम करत होती. अमेरिकेत 1G सर्वात आधी सादर केली. या फोन्सची बॅटरी लाइफ खुपच खराब होती. त्याचबरोबर याची वॉईस क्वालिटी आणि सिक्युरिटीही खुपच खराब होती.

१९९१ मध्ये GSM वर आधारित 2G टेक्नोलॉजी आली. डिजिटल सिग्नलचा यासाठी वापर करण्यात येत असे. याचा स्पीड 64 kbps होता. या टेक्नोलॉजीला सर्वात आधी फिनलँडमध्ये वापरण्यात आलं होतं. या फोनमध्ये एसएमएस, कॅमेरा आणि मेलिंग सारख्या सुविधांनी सुरु केले होते.

3G टेक्नोलॉजी २०००मध्ये आली. हेवी गेम्स, मोठ-मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करणे आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर्स सारख्या सुविधा या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. याला स्मार्टफोन असे म्हटल जात असे. यानंतर नवे डेटा प्लॅन्स लाँन्च करण्यात आले.

4G टेक्नोलॉजी २०११ मध्ये आली याच्या माध्यमातून यूजर्स १०० Mbps म्हणजेच 1Gbps च्या इंटरनेट स्पीडचा वापर करु शकत होते. 3G पेक्षाही ही टेक्नोलॉजी महागडी आहे. तर, लुकचा जर आपण विचार केला तर दोन्ही फोन्समध्ये जास्त अंतर नाही आहे.

5G टेक्नोलॉजी 2020 मध्ये लाँन्च केली जाऊ शकते. असे मानले जात आहे की, 5G टेक्नोलॉजीची कनेक्टिव्हिटी आणि स्पीडमध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. ही टेक्नोलॉजी भविष्यातील वायरलेस टेक्नोलॉजी असेल. तसेच 5G सपोर्ट करणा-या फोन्समध्ये सुरक्षाही अधिक असणार आहे.

Leave a Comment