यामाहाची तुफानी स्टार व्हेंचर स्पोर्ट टूरबाईक लाँच


यामाहाने त्यांची नवी यामाहा बाईक यूएसमध्ये लाँच केली असून तिची किंमत आहे १६ लाख ८ हजार रूपये. क्रूझ टूर बाईक सेगमेंटमध्ये ही बाईक तहलका माजवेल असा कंपनीचा दावा आहे. स्टार व्हेंचर स्पोर्ट टूरबाईक या नावाने ती लाँच केली गेली आहे. १८५४ सीसीचे एअरकूल्ड, चार व्हॉल्व्ह व्ही ट्वीन इंजिन, ६ स्पीड गिअरबॉक्स या बाईकची वैशिष्ठे आहेत.

या बाईकला ७ इंची एलईडी स्क्रीनसह इनफोटेनमेंट सिस्टीम, व्हॉईस असिस्टंट, दोन स्पीकर्स, ब्ल्यू टूथ फोनला कनेक्ट करून ऑपरेट करण्याची सुविधा दिली गेली आहे. व्हॉईस टेस्ट, नेव्हीगेशनसह असलेल्या या बाईकला यूएसबी कनेक्टिव्हिटीही दिली गेली आहे. यामुळे दीर्घ अंतराचा प्रवास करतानाही स्मार्टफोन चार्जिंगची सुविधा मिळणार आहे.एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, रायडिंग मोडस, राईड बाय वायर टेक्नॉलॉजी, मुळे रायडिंग कंफर्ट अनेक पटींनी वाढत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. ऑगस्ट २०१७ पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार आहे. भारतात ही बाईक लाँच होणार का व झाली तर कधी होणार याचा खुलासा अद्यापी केला गेलेला नाही.