आता कंडोम देखील झाला स्मार्ट


नवी दिल्ली – सध्याच्या काळात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्वकाही ट्रॅक केले जाते. पण आम्ही तुम्हाला आज एका नव्या गॅजेटसंदर्भात सांगणार आहोत जो तुमच्या बेडवरील परफॉर्मंसला ट्रॅक करण्यास मदत करणार आहे.

i-Con नावाचा स्मार्ट कंडोम ब्रिटिश कंपनीने तयार केला असून हा एक कंडोम नाही तर एक रिंग आहे जी सेक्स दरम्यान कंडोमच्यावर घालावी लागणार आहे. तुमचे आपल्या जोडीदारासोबत संबंध ठेवताना प्रदर्शन कसे आहे?, या स्मार्ट कंडोमद्वारे शारीरिक संबंध ठेवल्यावर तुम्ही किती कॅलरीज ऊर्जा खर्च केली याची माहितीही मिळणार आहे.

जवळपास पाच हजार रुपये ऐवढी या स्मार्ट कंडोमची किंमत असल्याचे बोलले जात आहे. बाजारात विक्रीसाठी हा स्मार्ट कंडोम कधी उपलब्ध होणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनीच्या मते, हा जगातील पहिला स्मार्ट कंडोम असून आपल्या स्मार्टफोनच्या अॅपसोबत हा पेअर करु शकणार आहात. वेबसाइटवर सांगण्यात आले आहे की, सध्या अंतिम टप्प्यात हे डिव्हाइस असून लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. पण हा कंडोम भारतात उपलब्ध नाही. या डिव्हाइसला एक मायक्रो युएसबी चार्जिंग पोर्ट असणार आहे. ज्यामुळे हे डिव्हाइस सहा ते आठ तास वापरता येणार आहे. हे डिव्हाइस नॅनो चीप आणि सेंसरच्या मदतीने काम करणार आहे. ही रिंग एका वर्षाच्या वॉरंटीसोबत उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment