मोटो झेड २ प्ले भारतात लॉन्च


नवी दिल्ली: आपला मोटो झेड२ प्ले हा जबरदस्त स्मार्टफोन लेनोवोने भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मोटो झेड प्ले या स्मार्टफोनचे पुढचे व्हर्जन असून ८ ते १४ जून दरम्यान या स्मार्टफोनची प्रीबुकींग केली जाऊ शकते. तर फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर १५ जूनपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

अ‍ॅन्ड्रॉईड ७.१ नॉगट्वर रन होणा-या या स्मार्टफोनसोबत मोटो मॉड्स सुद्धा वापरता येऊ शकतो. मेटल यूनिबॉडी डिझाईन असलेला मोटो झेड२ प्ले ५.९ एमएम पातळ आहे. मोटो झेड प्ले सारखा या स्मार्टफोनला बॅक पॅनल ग्लास तर नाही पण मोटो मॉड्स लावण्यासाठी कनेक्टिंग पिन्स देण्यात आले आहे. बॅक कॅमेरा उथळ रिंगमध्ये देण्यात आला आहे आणि फिंगरप्रिंट सेंसर होम बटनवर आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १०८०×१९२० पिक्सल आहे. सोबतच कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शनही आहे. स्मार्टफोनमध्ये २.२GHz चे स्नॅपड्रॅगन ६२६ ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. भारतात या हॅन्डसेटचे केवळ ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहे. या स्मार्टफोनला २टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड लावले जाऊ शकते. या दमदार स्मार्टफोनची किंमत २७ हजार ९९९ रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे. ग्राहक २ हजार रूपये देऊन या स्मार्टफोनची प्री बुकींग करू शकतात.

Leave a Comment