देशभरात लवकरच बीएसएनएलचे २५ हजार वायफाय स्पॉट


नवी दिल्ली – डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून २५ हजार वायफाय स्पॉट छोटे शहर आणि ग्रामीण भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार मंत्रालय त्यासाठी बीएसएनएलबरोबर एका समजोता पत्रावर स्वाक्षरी करणार असल्याचे वृत्त ‘सीएनबीसी आवाज’ या वाहिनीने दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल वायफाय हॉटस्पॉट लावण्यासाठीचे कंत्राट आयटीआयला देणार आहे. दरम्यान, बीएसएनएलकडून फक्त इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. तर वायफाय इक्विपमेंट बनवण्याचे काम आयटीआयकडे असते. भविष्यात सरकार याचा विस्तार करणार असल्याचे सांगण्यात येते.

डिजिटल इंडिया अभियानातंर्गत इ-गर्व्हनन्सला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्नरत आहे. शासन-प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि गती निश्चित करण्यासाठी सरकारी सेवांना ऑनलाइन करण्यावर भर दिला जात असल्यामुळे बीएसएनएल आणि दूरसंचार मंत्रालयातील ही भागिदारी महत्वपूर्ण मानली जाते.

Leave a Comment