जूनच्या १६ तारखेपासून रोज बदलणार पेट्रोलचे दर


नवी दिल्ली – १६जूनपासून देशभरात रोज भारतातील सर्व तेल कंपन्या पेट्रोलच्या दराचा आढावा घेणार असून संध्याकाळी ज्या किंमतीत पेट्रोल भरले असेल त्याच किंमतीत तुम्हाला सकाळी पेट्रोल मिळेल याची काही शाश्वती नाही. याचाच अर्थ कधी पेट्रोल स्वस्त असेल तर कधी महाग. यासंदर्भातील वृत्त ‘ईटी नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या निर्णयाची १६ जूनपासून अंमलबजावणी होणार असल्याचे ‘ईटी नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. पण अद्याप पेट्रोलसोबतच डिझेलच्या दराचाही रोज आढावा घेतला जाणार का हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Comment