भारतीय वंशाच्या व्यक्तीची नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी निवड


ह्यूस्टन – एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून नुकत्याच निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांच्या पथकात झाली असून १२ अंतराळवीरांची निवड तब्बल १८ हजार उमेदवारांमधून करण्यात आली. पृथ्वीच्या कक्षेतील आणि दीर्घ पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठी या सगळ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. नासाने निवडलेल्या या १२ जणांमध्ये सात पुरूष आणि पाच महिलांचा समावेश आहे. नासाची अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षण घेणारी ही २२ वी तुकडी असेल. ‘नासा’कडून यापूर्वी कधीच एकावेळी एवढ्या प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली नव्हती. पण नासाने यंदा अंतराळवीरांच्या भरतीसाठी जाहीर प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी नासाकडे १८ हजार ३०० अर्ज आले होते.

शारीरिक आणि शैक्षणिक परीक्षा अंतराळवीरांची निवड करण्यासाठी उमेदवारांची घेण्यात आली. संबंधित उमेदवाराने यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित यापैकी एका विषयात पदवी घेतली असली पाहिजे. तसेच उमेदवाराला जेट विमान चालवण्याचा १००० तासांचा अनुभव असला पाहिजे, अशा प्रमुख अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक उमेदवार यावेळी नासाचे हे निकष पूर्ण करण्याच्या जवळपास पोहोचले होते. त्यामुळे नासाकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने अंतराळवीर निवडण्यात आले. निवड झालेल्या १२ जणांना दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतराळ केंद्रावर संशोधन मोहिमेसाठी पाठवले जाऊ शकते. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी ह्यूस्टन येथे नासाने निवडलेल्या अंतराळवीरांची नावे जाहीर केली.

Leave a Comment