‘फादर्स डे’च्या निमित्ताने फ्लिपकार्ट २_९९९ रुपयांना देणार आयफोन ६ !


सध्याच्या घडीला ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वाढत असतानाच वेगवेगळ्या निमित्ताने ऑनलाईन कंपन्याही ऑफर्स जाहीर करत आपल्या ग्राहकांना आकर्षित करतात. फ्लिपकार्टनेही १८ जून रोजी असणाऱ्या ‘फादर्स डे’च्या निमित्ताने अशीच एक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर ८ जून ते १० जून पर्यंत उपलब्ध असून जास्तीत जास्त जणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीने केले आहे. यामध्ये आयफोन ६ (१६ जीबी) हा मोबाईल कमी किंमतीत मिळणार आहे. २,९९९ ऐवढी या मोबाईलची किंमत असेल असे जाहीर कऱण्यात आले आहे. मात्र नेमकी किंमत कंपनीने गुलदस्त्यात ठेवली आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर २४,९९० रुपयांना उपलब्ध असून फादर्स डेच्या निमित्ताने तो त्याहूनही कमी किंमतीला उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment