‘या’ नदीला पूर येण्याची वाट बघतात लोक… पण का?


या नदीतून बाहेर येते सोने
नवी दिल्ली : बिहारच्या पश्चिमेकडील चंपारण जिल्ह्यातील रामनगरमधील काही गावांना दरवर्षी पावसाळ्यात सोने मिळते. हे ऐकून तुम्ही आम्हाला वेड्यात काढत म्हणाल असे कुठे सोने मिळत का ? पण हे सोने घेऊन कोणी येत नाही तर नदीच्या पोटातून हे धातू बाहेर येतात.

शेजारच्या गावातील लोक या नदीच्या पाण्यातून सोने निवडून वर्षभराच्या कमाईचा जुगाड करतात. पण हे काम वाटत तेवढ सोपही नाही. पावसाळ्यात बिहारमध्ये पूर येणे ही खुप मोठी समस्या असून या नद्यांनादेखील पावसळ्यात खुप उधाण आलेले असते. गावातील मंडळी तेव्हा हा पूर कमी होण्याची वाट बघतात. जेव्हा पाणी कमी होते, तेव्हा गावकरी खास साधन घेऊन नदीमध्ये उतरतात. त्यानंतर नदीद्वारे आलेली वाळू आणि वाळूचे कण चाळून सोने्याचे कण बाहेर बाहेर काढतात. त्यानंतर ते बाजारात विकले जातात. पण जेवढे वाटत तेवढे हे काम सोप्पही नसते.

वाळूतून सोने काढण्याच काम काल किंवा आज असे अचानक सुरु झालेले नाही. तर या गावांमध्ये हे काम कित्येक वर्षापासून सुरु आहे. आदीवासींच्या कित्येक पिढ्या पहाडी नद्यांमधून सोने काढण्याच काम करत आहेत. कित्येकदा तर असे होते की लोक वाळू आणि कणांची छाननी करत असतात पण दिवसाअखेर हाथी काहीच लागत नाही. असे कित्येक दिवस आणि महिनेही निघून जातात. त्यामुळे हे काम खुप वेळखाऊही आहे. पण यात मिळणारा नफा जास्त असल्याने आदीवासी लोक हे काम करणे पसंत करतात.

हे लोक एवढी मेहनत करुनही जेव्हा बाजारात या सोन्याच्या कणांना विकायला जातात तेव्हा त्यांना वेगळाच अनुभव येतो. एका एका कणाचा सोनारांना काहीच फायदा नसतो. त्यामुळे सोनारांनी हे कण एकगठ्ठा मिळणे अपेक्षित असते. तेदेखील या कणांना एकत्र करतात, त्यांना गोळा करुन किरकोळ किंमत लावतात.