भारतीय मुलीचे नाव आकाशगंगेतील ग्रहाला मिळणार


भारताच्या कन्येचे नाव अवकाशातील एका ग्रहाच्या रुपाने झळकणार आहे. हा मान बंगळुरुमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या साहिथी पिंगाली या तरुणीला मिळाला असून बंगळूरुमधील प्रदूषित तलावांबद्दल तिने नुकतेच एक संशोधन केले. तिने यामध्ये सर्वोत्कृष्ट संशोधन आणि सादरीकरणाचे पारितोषिकही मिळविले. जागतिक स्तरावरील इंटेल इंटरनॅशनल सायन्स अॅंड इंजिनिअरींग फेअरमध्ये तिने आपला हा प्रकल्प सादर करत आपली कामगिरी दाखवून दिली.

विविध विषयांच्या विज्ञान प्रकल्पांची निवड या स्पर्धेत कऱण्यात आली. अंतिम फेरीसाठी एकूण २ हजार जणांची निवड करण्यात आली होती. तिने त्यात आघाडीचे स्थान मिळविले. एक मोबाईल अॅप्लिकेशन आणि तलावाचे मॉनिटरिंग करणारे किट तिने बनवले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे या दोन्हीमुळे शक्य होणार आहे. पहिल्या ३ टक्क्यांमध्ये स्थान मिळवलेल्या पिंगाली हिला अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील लिंक्लोन लॅबोरेटरीतर्फे सन्मानित कऱण्यात आले आहे. या संस्थेकडे लहान ग्रहांना नाव देण्याचे अधिकार आहेत.

Leave a Comment