हिरोची एक्स्ट्रीम २०० एस भारतात लवकरच


देशातील अग्रणी वाहन कंपनी हिरो मोटोकॉर्पने त्यांची पहिली २०० सीसी क्षमतेची मोटरसायकल एकस्ट्रीम २०० एस लवकरच भारतात सादर केली जात असल्याचे संकेत दिले आहेत. ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये ही बाईक सादर केली गेली होती व तेव्हापासून ग्राहकांना या बाईकच्या लॉचिंगची प्रतीक्षा होती असे सांगितले जात आहे.

ही बाईक सिंगल सिलेंडर कूल्ड इंजिनसह असून तिला सिक्स स्पीड गिअरबॉकस दिली जात आहे. तिचा टॉप स्पीड ताशी १५५ किमी असेल. बाईकला स्पोर्ट लूक दिला गेला आहे व फ्रंट व रियर टायर्सला डिस्क ब्रेक सुविधा दिली जात आहे. बाईक डायमंड टाईप फ्रेमसह येईल. तसेच एलईडी लाईटसही दिले गेले आहेत. पुढच्या वर्षाच्या सुरवातीला ती भारतीय बाजारात दाखल होईल असे सांगितले जात असून तिची किंमत साधारण ९५ हजार रूपयांपर्यंत असेल.

Leave a Comment