पेटीएमचा संस्थापक बांधणार ८२ कोटींचा बंगला


नवी दिल्ली – पेटीएम या डिजिटल पेमेंट बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा लवकरच दिल्लीतील प्रतिष्ठित ल्यूटन्स झोन परिसरात मोठा बंगला बांधणार असून विजय शर्मा यांनी त्यासाठी या ठिकाणी प्लॉट विकत घेतल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केले आहे.

तब्बल सहा हजार चौरस फुटांचा बंगला या प्लॉटवर शर्मा बांधणार असल्याचे समजते. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ८२ कोटी इतकी या बंगल्यांची किंमत असेल. त्यामुळे मोदी सरकारची नोटाबंदी पेटीएमला चांगलीच फळल्याची मजेशीर चर्चा रिअल इस्टेट आणि आयटी वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी डाबर समूहाच्या व्ही सी बर्मन यांनी गोल्फ लिंक्स परिसरात १६० कोटींचा बंगला विकत घेतला होता.

विजय शेखर शर्मा हे फोर्ब्सच्या यादीत भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश ठरले होते. १.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती. त्यांची संपत्ती गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १६२ टक्क्यांनी वाढली होती. साहजिकच नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांची आर्थिक भरभराट झाल्याची चर्चा रंगली होती. या घसघशीत उत्त्पन्नातूनच विजय शेखर शर्मा यांनी सहा हजार स्क्वेअर फुटांचा बंगला विकत घेतला आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून शर्मा यांनी त्यासाठीची अनामत रक्कम देऊ केल्याचे समजते.

Leave a Comment