पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीला वाढ


नवी दिल्ली: आपल्या ४ कोटींहून अधिक सदस्यांसाठी कर्मचारी भविष्य निधीने (ईपीएफओ) आपल्या खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. आता तुम्ही जर पीएफ खातेदार असाल तर तुम्ही ३० जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड तुमच्या पीएफ खात्याशी लिंक करू शकता. पूर्वोत्तर राज्यांसाठी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.

ईपीएफओने काढलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, तसे आदेश सर्व फिल्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत. सर्व सदस्यांना आधार क्रमांक १ जुलै २०१७ पर्यंत लिंक करायचा आहे तर पूर्वेकडील राज्यांना हे काम १ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

आपल्या सर्व सदस्यांना ईपीएफओने जानेवारीमध्ये आधार क्रमांक लिंक करण्याबाबत सांगितले होते. अनेक सदस्यांनी अद्यापही आधार लिंक केलेले नसल्याने आता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये हे कार्य १ ऑक्टोबर २०१७ आधी पूर्ण करायचे आहे. जानेवारीमध्ये ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांसाठी आधार क्रमांक खात्याशी लिंक करणे अनिवार्य केले होते.

Leave a Comment