जीएसटी लागू होण्यापूर्वी एसी, टीव्ही आणि फ्रीज झाले स्वस्त


मुंबई – १ जुलैपासून सरकार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणार असल्यामुळे सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू २० ते ४० टक्के सूट देऊन रिटेलर्स विकत आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ही योग्य वेळ आहे.

जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. कंपन्यांना जीएसटी लागू झाल्यानंतर जुन्या वस्तूंवर अधिक टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे जीएसटी लागू होण्याआधी कंपन्या जुना स्टॉक खपवण्यासाठी डिस्काऊंट देत आहेत. हा डिस्काऊंट तब्बल ५० टक्क्यांपर्यंतही देण्यात येत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांना जुन्या वस्तूंवर अधिक टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे जुन्या वस्तूंवर अधिक टॅक्सपासून वाचण्यासाठी कंपन्या सूट देऊन वस्तू विक्री वाढवून माल खपविण्याचा प्रयत्न करत आहेत. विक्रेते एमआरपीवर १० ते १५ टक्के सूट देतात आता ही सूट तिप्पट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपला खप वाढविण्यासाठी जवळपास सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविणा-या कंपन्या सूट देत आहेत तर काही कंपन्या गिफ्ट आणि वॉरंटी वाढवून देत असल्यामुळे तुम्हीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खुपच चांगला आहे.

Leave a Comment