अमेझॉन आक्षेपार्ह अॅश ट्रेमुळे पुन्हा वादात


नवी दिल्ली – पुन्हा एकदा एका नव्या वादात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन सापडली आहे. एका अॅश ट्रेमुळे अमेझॉनचा हा नवा वाद निर्माण झाला असून अमेझॉनवर विकायला ठेवलेला हा अॅश ट्रे अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेले डिझाइन या अॅश ट्रेचे बनविण्यात आले आहे. अशा प्रकारचे डिझाइन असलेले मेटल आणि चिकण माती असे दोन प्रकारातील अॅश ट्रे अमेझॉनच्या या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी मेटलच्या ट्रेची किंमत तब्बल ४४४१ रूपये तर चिकण मातीच्या ट्रेची किंमत २९९ रूपये आहे.

सोशल मीडियावर अमेझॉनवरची ही वस्तू काही वेळातच व्हायरल झाली होती. नेटीझन्सने अमेझॉन विकत असलेल्या या ट्रेवर बंदीची मागणीसुद्धा केली आहे. या संदर्भातील तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली आहे. अमेझॉनवर सोशल मीडियामधून टीकेची झोड उठू लागल्यावर त्या अॅश ट्रेला साइटवरून काढून टाकले आहे.

Leave a Comment