स्वातंत्र्याचे प्रतीक बनलेली नाजूक फेदर ज्वेलरी


प्रत्येक प्रसंगासाठी कोणती आभूषणे करावी याच्या कांही परंपरा प्रत्येक देशात दिसतात. सण समारंभ, लग्नकार्ये, पार्ट्या, फंक्शन्स अशा वेळी ज्युवेलरी हमखास वापरली जाते. दागिने हा आजकालचा फॅशन आयकॉन बनला आहे व तयामुळे त्यात विविध प्रयोगही केले जात आहेत. पारंपारिक सोने, चांदी, हिर्‍यांच्या दागिन्यांसोबत आता विविध मेटल्सपासून बनलेले, कापडापासून बनलेले, प्लास्टीकपासून बनलेले, फायबर पासून बनलेले असे अनेक दागिन्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्याला आता नैसर्गिक वस्तूंपासून बनलेल्या दागिन्यांचीही जोड मिळते आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे फेदर ज्युवेलरी. म्हणजेच पक्ष्यांच्या पिसांपासून बनलेले दागिने.

पिसांपासून बनलेले दागिने वापरण्याची प्रथा तशी पुरातन आहे. आजही अनेक आदिवासी जमाती विविध प्रकारच्य पिसांपासून बनलेले अलंकार घालतात. फॅशन डिझायनर्सनीही आता पिसांचा वापर करून नाजूक, हलकी, अतिशय सुंदर ज्येवली तयार करण्याकडे लक्ष पुरविले आहे. मात्र ही केवळ फॅशन नाही तर त्यामागे कांही संकेत आहेत.


पक्षी हा स्वातंत्र्याचे तसेच प्रवासाचे प्रतीक मानला जातो. पक्ष्यांचे नाते आकाशाशी जोडलेले असते त्यामुळे पिसांपासून बनलेले अलंकार धारण करण्यामागे अमर्याद स्वातंत्र, तसेच स्वर्गाशी नाते जोडण्याचा विचार आहे. मन आत्म्याचा स्वर्गाच्या दिशेने प्रवास असाही त्याचा अर्थ आहे. डिझायनर्सनी पिसांपासून सर्व प्रकारचे अलंकार तयार केले आहेत व त्यांना मोठी मागणीही आहे. अर्थात हे दागिने वापरताना नाजूक असल्याने अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागतात तसेच त्यांची सफाईही अतिशय काळजीने करावी लागते.

तज्ञांच्या मते पिसांपासूनचे दागिने स्वच्छ करताना हळूवार पुसून काढावेत. पाण्यात भिजले असतील तर आपोआप सुकू द्यावेत तसेच त्यांच्यावर धूळ जमली असेल तर ब्रशच्या सहाय्याने ते हळूवार साफ करावेत. हे दागिने डबीत ठेवण्यापेक्षा लटकवून ठेवणे अधिक चांगले कारण डबीत ते दुमडू शकतात. हे दागिने तुम्हाला समारंभाच्या गर्दीतही वेगळा लूक नक्कीच देऊ शकतात.

Leave a Comment