सोन्याचांदीची पुन्हा उसळी


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात होत असलेली वाढ व स्थानिक बाजारात वाढलेली मागणी यामुळे सोने चांदीचे भाव सतत तिसर्‍या दिवशीही चढते राहिले आहेत. मंगळवारी दिल्ली बाजारात सोन्याच्या भावात १६० रूपयांची वाढ होऊन ते १० ग्रॅमला २९७५० रूपयांवर पोहोचले तर चांदीचे भाव किलोमागे ४०० रूपयांनी वाढून ४०८४० रूपयांवर पोहोचले.

जागतिक बाजारात सोने मजबूत झाल्याने तसेच वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत. त्यातच स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. तर चांदीला औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढली आहे. सणांचे दिवस जवळ येत चालल्याने चांदीची नाणी तयार करणार्‍या उद्योगांकडूनही चांदीला मागणी येत असल्याने दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment