तुम्हाला ‘हा’ मंत्र बनवेल कोट्याधीश


मुंबई – आपल्या धन-संपती, सुख समृद्धी आणि जीवनात यशस्वी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. प्रत्येकजण यासाठीच मेहनत करत असतो आणि सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. आपल्या मनाची शांतता सध्याच्या धावपळीच्या जिवनात मनुष्य हरवून टाकत आहे. मनुष्य सुख-समृद्ध आणि इतर सुविधांकडे आकर्षित होऊन या गोष्टी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आयुष्यात जे काही कमवत आहे त्यापेक्षा अधिक मिळावे यासाठी मनुष्य प्रयत्न करत आहे. पण त्याला हे मिळविण्यासाठी रात्र-दिवस मेहनत करावी लागत आहे. मनुष्याची ही इच्छा अनेकदा इतकी प्रभावी होते की, कळत-नकळत मनुष्य अनेकदा संकटात सापडतो.

काही मंत्रांच्या माध्यमातूनही सुख-शांती आणि समृद्धी मनुष्याला मिळवता येऊ शकते. आम्ही आज तुम्हाला अशाच एका मंत्रासंदर्भात सांगणार आहोत. तुम्हाला या मंत्राचा योग्य उच्चार केल्यास अल्पावधीतच सुख-समृद्धी तर मिळेलच. त्यासोबतच, तुम्ही कोट्याधीशही व्हाल. एक असा मंत्र आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्याही दूर होतील.

“लोका समस्ता सुखिनो भवन्तु” असा हा मंत्र असून या मंत्राचा अर्थ आहे की, सर्व संसारात आनंद निर्माण होईल. या मंत्राच्या उच्चाराने व्यक्तीच्या आचरणात शुद्धता, स्वच्छता निर्णाण होते. एखादे महत्वपूर्ण काम करण्यापूर्वी या मंत्राच्या उच्चार करावा. यासोबतच, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रभाव नक्कीच टाकाल.