आला फोन कॉललाही देता येणार क्वालिटी रेटिंग !


माय कॉल हे नवीन अॅप भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) सुरू केले असून यूजर्स आपल्या मोबाईल फोन कॉलला क्वालिटी रेटिंग या अॅपवर देऊ शकतील. तसेच संबंधित यूजर्स ही माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणालाही देऊ शकतात.

मोबाईल फोन यूजर्स आपल्या व्हाईस कॉलच्या गुणवत्तेबाबत त्याच वेळेस आपल्याला आलेला अनुभव माय कॉल या अॅपद्वारे ‘ट्राय’ला सांगता येणार आहे. ग्राहकांनाया माध्यमातून आलेले अनुभव, नेटवर्कची गुणवत्ता याबाबतची आकडेवारी जमा करण्यास ‘ट्राय’ला मदत मिळणार आहे. हा अॅप डाऊनलोड केल्यास प्रत्येक कॉलनंतर संबंधिताला पॉप-अप नोटिफिकेशन येईल. त्यात कॉलच्या गुणवत्तेबाबत आलेला अनुभव आणि त्याची माहिती देण्यासंबंधी विनंती करण्यात येईल. यात यूजर्सला आपले रेटिंग स्टार्सही देता येणार आहेत. रेटिंगसह यूजर्सना आवाज, आवाजातील अडथळा आणि कॉल ड्रॉपसारख्या समस्यांविषयीही अधिकची माहिती ट्रायला देता येणार आहे.

कॉल ड्रॉपची समस्या दूर करण्यासाठी सरकार आणि ट्रायकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकार या क्षेत्रात काही ठोस आणि चांगले बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. याशिवाय ‘ट्राय’ने आपल्या Do Not Disturb अॅपमध्येही ‘इंटेलीजेंट स्पॅम डिटेक्शन इंजिन’ आणि ‘अपडेट अबाऊट अॅक्शन टेकन ऑन कम्प्लेंट’ यांसारखे फिचर्सही अपडेट केले आहेत.

Leave a Comment