ट्रॅकशिवाय चालणार्‍या रेल्वेच्या चाचण्या चीनमध्ये यशस्वी


उच्च तंत्रज्ञानात जगात अग्रेसर असलेल्या चीनने त्यांच्या हुनान प्रांतात ट्रॅकशिवाय चालू शकणार्‍या रेल्वेच्या यशस्वी चाचण्या नुकत्याच घेतल्या आहेत. ही रेल्वे व्हर्च्युअल म्हणजे आभासी रूळांवरून धावते व आणीबाणीच्या परिस्थितीत रस्तांवरूही चालू शकते. या रेल्वेसाठी येणारा खर्चही नेहमीच्या रेल्वेच्या तुलनेत खूपच कमी आहे. शहरात सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासठी ही रेल्वे बनविली गेली असून ती २०१८ पासून कार्यरत होणार आहे.

या रेल्वेला बस प्रमाणे स्टीअरिंग व्हील आहे व त्याचा वापर करून चालक ती वळवू शकतो. ही इलेक्ट्रीक रेल्वे आहे व १० मिनिटांच्या चार्जवर ती २५ किमी अंतर कापू शकते. तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी ७० किमी. आत्पकालिन परिस्थिती असेल तर ही रेल्वे रस्त्यांवरूनही चालविता येते. त्यासाठी खास सेन्सर बसविले गेले असून हे सेन्सर रस्त्याची लांबी, रूंदी जाणून घेऊन त्याप्रमाणे चालकाला सूचना मिळते. १०० फूट लांबीच्या या रेल्वेतून ३०७ प्रवासी प्रवास करू शकतात तसेच ही रेल्वे २५ वर्षे सेवा देऊ शकते.

या रेल्वेच्या बांधणीसाठी ७६ कोटी रूपये खर्च आला असून हा नेहमीच्या रेल्वेसाठी येणार्‍या ३७८ पासून ६५५ कोटींच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. या रेल्वेचे डिझाईन २०१३ पासून तयार केले जात होते. ही इलेक्ट्रीक रेल्वे असल्याने तिच्यामुळे प्रदूषण होत नाही.

Leave a Comment