भगवद् गीतेशी आहे या रॉयल एनफिल्डचे नाते


रॉयल एनफिल्ड बुलेटच्या अनेक बाईक्स कस्टमाईज स्वरूपात तयार करणार्‍या हैद्राबादच्या एमोर कस्टम्सने एक युनिक बाईक भारतीय लष्कराच्या जाँबाज सैनिकासाठी कस्टमाईज केली आहे. भगवद् गीतेशी नाते सांगणारी ही एनफिल्डची इलेक्ट्रा बुलेट परंतप या नावाने तयार केली गेली आहे. परंतप हे अजुर्नाचे एक नांव अाहे व याचा अर्थ आहे एकाग्रतेने शत्रूचा खातमा करणारा वीर. या बाईकचे गीतेबरोबर आणखीही एक नाते जोडले गेले आहे. या बाईकच्या फ्यूल टँकवर गीतेतील श्लोक लिहिला गेला आहे. याचा अर्थ आहे रणात मृत्यू आला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल व जिंकलास तर पृथ्वीचा राजा बनशील. तेव्हा अर्जुना उठ आणि युद्धाचा निश्चय कर.


इंडियन आर्मीच्या जुन्या बटालियन बाँबे सॅपर्सला ही बाईक समर्पित केली गेली आहे. बाईकच्या फ्यूल टँकची स्टाईल थाई पॅडने सजविली गेली असून ती सीटच्या रंगाशी मिळतीजुळती आहे. तसेच हेडलँप नवीन एलईडी युनिटसह असून त्यात छोटे एलईडी बल्ब बसविले गेले आहेत. इंडिकेटरही एलईडी बल्बपासून बनविले गेले आहेत. या बाईकचे हेल्मेटही कस्टमाईज केले गेले आहे.