देशातील सर्वात मोठ्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण


नवी दिल्ली – संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आणि देशातील सर्वात मोठा उपग्रह ‘जीएसएलव्ही मार्क ३’ च्या प्रक्षेपणासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. देशातच या उपग्रहाला विकसित करण्यात आलेले क्रायोजेनिक इंजिन लावण्यात आल्यामुळे अंतराळात उपग्रह यंत्रणा स्थापित होईल. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील.

‘जीसॅट-१९’ ला घेऊन हे उपग्रह जाईल. आज (सोमवार) सांयकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरून ‘जीएसएलव्ही मार्क ३’ हे उपग्रह उड्डाण करेल. रविवारी दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांपासून ‘जीएसएलव्ही मार्क ३’ च्या प्रक्षेपणासाठी उलट गणती सुरू झाली, असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारताचे आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे हे उपग्रह आहे. यामुळे या क्षेत्रात आपल्याला स्वयंपूर्णता तर मिळेलच, शिवाय आपल्याला परदेशी ग्राहकही आकर्षित करता येऊ शकेल अशी माहिती, इस्त्रोचे अध्यक्ष एस.एस. किरणकुमार यांनी दिली.

Leave a Comment